नागपूरात 33 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाबाधिताची संख्या 1034 वर

571

नागपूरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच आहे. रविवारी आणखी 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सोमवारी त्यात नव्या 33 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता नागपूरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने हजाराचा टप्पा गाठला असून रुग्णसंख्या 1034 इतकी झाली आहे. यातल्या 622 जणांनी कोरोनावर मात केली असून, उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले आहे.

नागपूर शहरात मोमीनपुरा, सतरंजीपुरा हे हॉटस्पॉट ठरले होते. मात्र, अलीकडील काही दिवसात तेथील परिस्थितीत पूर्णपणे बदलताना दिसत असून ग्रामीण भागातील हिंगणा व शहरातील नाईक तलाव परिसरातील रुग्णसंख्या वाढल्याचे सर्वांचीच चिंता वाढली आहे. मेयो रुग्णालयाच्या प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आलेल्या अहवालांमध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या नाईक तलाव, बांगलादेश येथील 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे सर्व व्हीएनआयटी विलगीकरण केंद्रात दाखल होते. यापैकी तिघांचे अहवाल शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास तर आठ जणांचे पहाटेच्या सुमारास पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सतरंजीपुर्‍यातील एका गर्भवती महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय एम्सच्या प्रयोगशाळेमद्ये 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1034 वर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या