आषाढी एकादशीला वारकऱ्यांच्या सुविधांसाठी 34 कोटी 36 लाखांचा निधी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना विविध जिह्यांमध्ये सोयीसुविधा देण्यासाठी राज्य सरकारने 34 कोटी 36 लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे वारकऱ्यांना स्वच्छतागृहांपासून पिण्याचे पाणी अशा सुविधा उपलब्ध होणार आहे.

ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी अनुदान योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत वारकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. पुणे, सातारा, सोलापूर या जिह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत जाणाऱ्या भाविकांना स्वच्छता सुविधा पुरवण्यात येणार आहेत.