कश्मीरमधील 34 नजरकैदेतील नेत्यांना आमदार निवासात हलवले

737

कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने 34 नेत्यांना श्रीनगरच्या सेंटूर हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले होते. सर्व नेत्यांना आमदार निवासात हलवण्यात आले आहे.  हॉटेलमध्ये सगळ्यांची व्यवस्था करता येत नव्हती म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

नजरकैदेतील नेत्यांमध्ये सज्जाद लोन, नॅशनल कॉन्फरन्सचे अली मोहम्मद, पीडीचे नईम अख्तर आणि माजी आयएस अधिकारी शाह फैसल यांचा समावेश आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरमध्ये थंडीने चांगलाच जोर धरला आहे. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि इतर पक्षांच्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी जवान तैनात आहेत. वाढत्या थंडीमुळे जवानांची तब्येत बिघडत आहे.

सेंटुर हॉटेल हे डल तलावाच्या शेजारी आहे. पाच ऑगस्टपासून या नेत्यांनी हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्याच दिवशी केंद्र सरकारने कलम 370 हटवून जम्मू कश्मीर आणि लडाखला केंद्रशासित राज्य घोषित केले होते.

श्रीनगरसह कश्मीर खोर्‍यात थंडी चांगलीच वाढली आहे. नोव्हेंबरच्या सुरूवातीलाच बर्फवृष्टी सुरू झाली आहे. नवनिर्मित केंद्रशासित प्रदेशाची राजधानी हिवाळ्यानिमित्त श्रीनगरहून जम्मूला स्थलांतरित करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या