नगर जिल्ह्यात 340 रुग्णांना डिस्चार्ज; कोरोनाबाधितांची संख्या 22 ने वाढली

433

नगर जिल्ह्यात मंगळवारी 340 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता 4365 इतकी झाली आहे. तर सोमवारी सायंकाळी 6 वाजेपासून मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 22 ने वाढ झाली आह. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1925 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 78 असून एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 6368 झाली आहे.

सोमवारी सायंकाळपासून मंगळवारी दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 22 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा -1, नगर मनपा 5, तारकपूर नगर 1, कल्याण रोड 1, गुगळे कॉलनी 1, नगर शहर 2, कॅन्टोन्मेंट 2, पारनेर 14 – रुई छत्रपती 1, पारनेर 13 येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात मंगळवारी एकूण 340 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा 197, संगमनेर 14, राहाता 17, पाथर्डी 27, नगर ग्रामीण 10, श्रीरामपूर 18, कॅन्टोन्मेंट 8, नेवासा 10, श्रीगोंदा 9,पारनेर 7, अकोले 1, राहुरी 4, शेवगाव 6 कोपरगाव 1, जामखेड 4, कर्जत 7 येथील रुग्णांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या