‘त्या’ दिवशी अवघ्या तीन तासांत, मुंबई, ठाण्यात 35 दशलक्ष युनिट विजेचे भारनियमन

महापारेषणच्या वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने 12 ऑक्टोबर रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवघ्या तीन-साडेतीन तासांत 35 दशलक्ष युनिट विजेचे भारनियमन झाले. या कालावधीत वीज वितरण कंपन्यांकडे मुबलक वीज उपलब्ध असतानाही त्याचे वितरण (विक्री) होऊ न शकल्याने त्यांना जवळपास 21 कोटी रुपयांचा शॉक बसला आहे.

मुंबईत सध्या दररोज 55 दशलक्ष युनिट विजेचे वितरण केले जाते, तर मुंबई वगळता राज्यभरात 350 दशलक्ष युनिटच्या जवळपास वीज वितरण होते. त्यासाठी महानिर्मित्ती, टाटा, अदानी, एनटीपीसीसह अन्य खासगी कंपन्यांकडून वीज घेतली जाते. त्या पार्श्वभूमीवर वीज निर्मिती कंपन्या विजेच्या मागणीचा विचार करून प्रत्येक मिनिटाचे नियोजन करून वीजनिर्मिती करतात. पण सोमवारी महापारेषणच्या 400 केव्हीच्या उच्च दाब वीजवाहिनीत आणि खारघर उपकेंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे मुंबईचा वीजपुरवठा ठप्प झाला होता. मुंबईचा 2500-2600 मेगावॅटच्या घरात असलेला वीजपुरवठा सकाळी दहानंतर 500 मेगावॅटपर्यंत खाली आला होता. हाच ट्रेंड पुढील तीन-चार तास चालल्याने तब्बल दहा दशलक्ष युनिटचे भारनियमन झाले.

 12 ऑक्टोबर रोजीची मुंबईच्या विजेची स्थिती (मेगावॅटमध्ये)

वेळ                   वीज पुरवठा भारनियमन

सकाळी 9               2500           00

सकाळी 10             514             2164

सकाळी 11             510             2262

दुपारी 12               962             1816

दुपारी 1                 1676           1074

दुपारी 2                 2205           500

आपली प्रतिक्रिया द्या