संभाजीनगरमध्ये आढळले 37 कोरोनाचे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 1285 वर

1078

संभाजीनगर जिल्ह्यात आज 37 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1385 झाली आहे. तसेच आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) आज हुसेन कॉलनी दहा, सादात नगर पाच, संजय नगर तीन,  सिल्क मिल कॉलनी दोन, सदानंद कॉलनी, राम नगर, पुंडलिक नगर, भीमनगर, संभाजी कॉलनी, चाऊस कॉलनी, न्याय नगरातील प्रत्येकी एक असे एकूण 27 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, असे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले.

शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) आज सिल्क मिल कॉलनीतील दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या घाटीमध्ये 79 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. यामध्ये दहा जणांची प्रकृती गंभीर, 69 जणांची प्रकृती सामान्य आहे. आज सकाळी   न्याय नगर, एन-8 सिडकोतील 63 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना पूर्वीपासून उच्च रक्तदाबाचा आजार होता. तसेच टाऊन हॉल येथील 51 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा दुपारी चार वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने घाटीमध्ये आतापर्यंत 45 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. मिनी घाटीमध्ये एक आणि खासगी रुग्णालयात चार असे एकूण 5 कोरोनाबाधितांचाही मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 50 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या