एसआरपीएफच्या जवानांना योगाचे धडे, 388 जवानांनी केली कोरोनावर मात

578

कोरोनाशी दोन हात करणार्‍या राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानांना योगाचे धडे दिले जात आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या 545 जवाना पैकी 388 जवानांनी कोरोनावर मात केली आहे.

पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल, अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून एका वेळी 1 हजार असे मिळून राज्यातील 16 हजार जवानांना ऑनलाईन योगाचे धडे देण्यात येत आहे. जे जवान रेड झोन आणि क्वारंटाईन मध्ये काम करत आहे, त्यांना सकाळी आणि सायंकाळी योगाचे धडे दिले जात आहे. फोन, ऑनलाईन आणि विडिओ कॉन्फरिंन्सगच्या माध्यमातून डॉक्टर हे जवानांच्या संपर्कात राहणार आहे. त्याच्या नेमक्या काय अडचणी आहेत, या जाणून घेत आहेत.

कोरोनाची लागण झालेल्या जवानांचे मनोबल वाढवण्यात येत आहे. योगासना मुळे त्याचा फायदा जवानांना होतोय. श्वसन क्रियेची क्षमता वाढवण्यावर भर देत आहेत.  – बी. जी. शेखर, उप महानिरीक्षक (मुख्यालय), एसआरपीएफ

आपली प्रतिक्रिया द्या