कुर्डुवाडीतील व्यापाऱ्यावर हल्ला करणाऱ्या संशयितांना अटक

516

कुर्डुवाडीतील व्यापाऱ्यावर 23 जून रोजी रात्री झालेल्या हल्ल्यातील संशयित आरोपींना शुक्रवारी रात्री सोलापूर गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. या हल्ल्यानंतर कुर्डुवाडीतील वापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. आता या हल्ल्यातील संशयितांना अटक करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुर्डुवाडीतील व्यापारी प्रवीण ढवळसकर यांच्यावर 23 जून रोजी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आला होता. कुबेर मंगल कार्यालयासमोर दुकान बंद करून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यात प्रवीण जखमी झाले होते. शुक्रवारी रात्री कुर्डुवाडी बायपासजवळ या प्रकरणातील संशयित आरोपींना पिस्तुलासह अटक करण्यात आली. आरोपींमध्ये भैय्या लेंगरे (वय 33), सूरज जोतिराम भोसले( वय 32),गणेश गायकवाड(वय 30),गणेश कापरे (वय 32) यांचा समावेश आहे. ही कारवाई सोलापूर गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या