उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरने करावा लागला प्रवास

देशभरात मुसळधार पावसाचा कहर पाहायला आहे. गेल्या काही दिवसांत हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली, प्रयागराज आणि मध्य प्रदेशसह अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे  जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजस्थानमधील विद्यार्थ्यांना परिक्षेला जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली आहे.

राजस्थानमधील बालोत्रा ​येथील चार विद्यार्थी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे पोहोचले, परंतु सततचा पाऊस आणि भूस्खलनामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे त्यांना परिक्षेला जाण्यासाठी अडचणी येत होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी या कठीण प्रसंगातून एक मार्ग काढला. विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी हल्द्वानी ते उत्तराखंडमधील मुनसियारी असा हेलिकॉप्टरने प्रवास केला आणि परीक्षा केंद्रावर पोहोचले. यानंतर त्याच मार्गाने पुन्हा परतले.

नेवारी गावातील ओमाराम चौधरी, सिंधरी येथील मगराम चौधरी, बांकियावास येथील प्रकाश चौधरी आणि गिदा येथील लकी चौधरी अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी उत्तराखंड मुक्त विद्यापीठातून बी.एड. पदवी घेत आहेत.3 सप्टेंबर रोजी त्यांना मुन्सियारी येथील आरएस टोलिया पीजी कॉलेजमध्ये त्यांच्या अंतिम सत्राच्या परीक्षेला बसायचे होते. मात्र पावसामुळे तेथील रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली. हल्द्वानी-पिथोरागड आणि टनकपूर-पिथोरागड रस्ते बंद असल्याने टॅक्सी चालकांनी त्यांना परीक्षा केंद्रावर नेण्यास नकार दिला.

दरम्यान परिक्षेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टर सेवेबद्दल माहिती मिळवली. यानंतर त्यांनी हेरिटेज एव्हिएशनच्या सीईओशी संपर्क साधला आणि मदतीची विनंती केली. विद्यार्थ्यांची अडचण पाहता कंपनीने विशेष व्यवस्था केली आणि दोन वैमानिकांसह एक हेलिकॉप्टर पाठवले. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रवासासाठी सुमारे 5,200रुपये दिले, म्हणजे राउंड ट्रिपसाठी एकूण 10,400रुपये दिले.

उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटी, अनेकजण बेपत्ता