यूपीएससी परीक्षा अधिसूचनेत तब्बल 40 चुका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2026 ची अधिसूचना जारी केली असून या अधिसूचनेतच एक दोन नव्हे, तर तब्बल 40 चुका आढळल्याने खळबळ उडाली आहे. एवढय़ा मोठय़ा परीक्षेत 40 चुका कशा काय आढळू शकतात, त्याकडे कोणाचेच कसे लक्ष गेले नाही? असा सवाल आता विचारला जात आहे. अधिसूचनेतील पान दोनवर ‘Examination’ ऐवजी ‘Examinaiton’ आणि ‘candidates’ ऐवजी ‘cadidates’ असे लिहिले आहे, तर पान सातवर ‘Benchmark’ ऐवजी ‘Bechmark’, ‘Functional’ ऐवजी ‘Functinal’ आणि पान आठवर ‘Abbreviations’ ऐवजी ‘Abbriviations’ असे लिहिले आहे. युजर्स हे सर्व स्क्रीनशॉट शेअर करून आयोगाला ट्रोल करत आहेत.