सातारा जिल्ह्यातील 40 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांची संख्या 241 वर

619

सातारा जिल्ह्यातील 40 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यातला एक लोधवडे ( ता. माण ) एकाचा मृत्यू झाला होता. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर एकजण पूर्वीच पॉझिटिव्ह असून 10 दिवसाच्या तपासणीनंतरही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 40 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 241 झाली असून 122 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 113 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईहून आलेला कराड तालुक्यातील बाचोली येथील 47 वर्षीय पुरुष, जळगाव येथून आलेला उंब्रज येथील 58 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला गवेवाडी ता. पाटण येथील 27 वर्षीय पुरुष व 20 वर्षीय युवक, मुंबई येथून प्रवास करुन आलेला भुलेकरवाडी ता. पाटण येथील 60 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली होलेवाडी ता. कोरेगाव येथील 40 वर्षीय महिला, शिरताव ता. माण येथील 25 वर्षीय पुरुष, लोधवडे ता. माण येथील 67 वर्षीय पुरुष (मृत), शिरताव ता. माण येथील 28 वर्षीय पुरुष, कोळकी ता. फलटण येथील निकट सहवासित 34 व 60 वर्षीय महिला, 9 वर्षाचे दोन बालके, जकातवाडी ता. सातारा येथील 27 वर्षीय पुरुष, शाहुपूरी ता. सातारा येथील 29 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला, धनवडेवाडी ता. सातारा येथील निकट सहावासित 36 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला, घारदरे ता. खंडाळा येथील 51 वर्षीय पुरुष, येळेवाडी ता. खंडाळा येथील 70 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला वासोली ता. वाई येथील 47 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला पिंपोडे ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली पारगाव खंडाळा येथील 44 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली ता. कराड येथील 37 वर्षीय महिला, पाटण येथील निकट सहवासित 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 10 व 8 वर्षांचे बालक, 46 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 44 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक, 19 वर्षीय युवक, 52 वर्षीय महिला, असे एकूण 40 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मलकापूर ता. कराड येथील 49 वर्षीय पुरुष पूर्वीच पॉझिटिव्ह असून 10 दिवसाच्या तपासणीनंतरही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

एन.सी.सी.एस. पुणे यांनी 190 जणांचे अहवाल व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांनी पाठवलेले 36 असे एकूण 226 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या