
दारुड्या बापाने एक वर्षाच्या पोटच्या पोरीला फरशीवर नराधम आपटल्याची सुरेश दोर धक्कादायक घटना पेणमध्ये घडली आहे. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला. सुरेश दोरे असे नराधम बापाचे नाव आहे. वडखळ पोलिसांनी माथेफिरू पित्याच्या मुसक्या आवळल्या.
पेण तालुक्यातील पाबळ येथील देवमाळ ठाकूरवाडी येथे सुरेश दोरे राहतो. मजुरीचे अत्यल्प उत्पन्न व दारूचे व्यसन असलेल्या सुरेशला दोन पत्नी असून तो त्यांना मारहाण करत असल्यामुळे त्या सुरेशला सोडून गेल्या होत्या. त्याची तिसरी पत्नीही याच कारणामुळे दीड महिन्यापूर्वी त्याला सोडून गेली होती. या तिन्ही पत्नींकडून त्याला चार मुले होती. पहिला मोठा मुलगा 5 वर्षांचा तर दुसरा मुलगा 4 वर्षांचा आहे. तिसरी मुलगी 3 वर्षांची आहे व चौथी मुलगी विजया 1 वर्षाची होती.
तणावातून कृत्य
सोडून गेलेल्या पत्नी, दारूचे व्यसन व चार मुलांची जबाबदारी यामुळे तणावात असलेल्या सुरेशने रागाच्या भरात एक वर्षांच्या विजया उर्फ बेबीला फरशीवर आपटून ठार मारले. या घटनेची माहिती मिळताच वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सुरेशला अटक केली. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.