कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 420 डॉक्टरांचा मृत्यू, सर्वाधिक मृत्यू दिल्लीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा फटका समाजच्या प्रत्येक व्यक्तीला बसला आहे. सामान्य नागरिकांपासून मंत्री, सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण झाली होती. इतकेच नाही तर या कोरोनाचा इलाज करणार्‍या डॉक्टरांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 420 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू दिल्लीत झाले असून त्यांची संख्या 100 इतकी आहे. कोरोना रुग्णांना वाचवताना डॉक्टरांचाही मृत्यू झाला आहे.  

असे असले तरी देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 57 हजार 299 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर 3 लाख 57 हजार 630 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 4 हजार 194 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 2 लाख 95 हजार 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 29 लाख 23 हजार 400 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तर दुसरीकडे कोरोना संकटात आता काळी बुरशी म्हणजेच म्‍युकोरमायकॉसिस संकट वाढताना दिसत आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह 15 राज्यांत 9 हजारहून म्‍युकोरमायकॉसिसचे रुग्ण आढळले आहेत. तसेच म्‍युकोरमायकॉसिसमुळे आतापर्यंत 235 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्‍युकोरमायकॉसिसची सर्वाधिक रुग्ण गुजरातमध्ये असून त्यांची संख्या  हजा इतकी आहे. या काळ्या बुरशीमुळे अनेक रुग्णांचे डोळेही काढावे लागले आहेत.