बुलढाण्यात आढळले कोरोनाचे 43 रुग्ण, 11रुग्ण कोरोनामुक्त

570

 प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी काल रात्री व आज असे एकूण 133 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 105 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 28 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. तसेच आजपासून रॅपीड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे कोरोना निदान करणे सुरू करण्यात आले आहे. या टेस्टच्या माध्यमातून आज 91 अहवाल प्राप्त झाले आहे. त्यामध्ये 76 निगेटीव्ह व 15 पॉझीटीव्ह अहवाल आहेत. अशाप्रकारे प्रयोगशाळेतून व रॅपीड टेस्टद्वारे एकूण 224 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामधून एकूण 181 निगेटीव्ह अहवाल प्राप्त असून 43 अहवाल पॉझीटीव्ह आहेत.

आज 11 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत प्रयोगशाळेतून व रॅपिड टेसटद्वारे 3287 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 201 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 201 आहे.  आज रोजी 271 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 3287 आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 343 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 201 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात प्रयोशाळेतून प्राप्त पॉझीटीव्ह अहवालातील 114 व रॅपिड टेस्ट किटमधील 15 अशाप्रकारे 129 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 13 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या