Nagar News – दारणा धरणातून गोदावरीत 46 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर नाशिक, घोटी, ईगतपुरी व धरण कार्यक्षेत्रात 24 तासात दमदार पाऊस पडला. सुमारे 495 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून दारणा, गंगापूर धरणे जवळजवळ 86 टक्के भरली आहेत. दारणा धरणात 86.54 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर भाम, भावली धरणे पूर्णपणे भरली आहे.

दारणेतून रविवारी गोदावरी नदीत 46 हजार पेक्षा जास्त क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. मात्र पावसाची स्थिती अशीच राहिली तर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. सर्वत्र पावसाची संततधार सुरू असल्याने गोदावरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.