अमरावतीत ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढला; रुग्णांची संख्या 3 हजाराच्या उंबरठ्यावर

584

अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 3 हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. रविवारी आलेल्या अहवालानुसार 48 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 997 वर पोहोचली आहे. रविवारी सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागातील धामणगाव रेल्वे येथे आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात शनिवारी 77 नव्या रुग्णांची नोंद झाली असून रविवारीही कोरोनाबाधितांची वाढ कायम आहे. आतापर्यंत 48 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सुरूवातीला 17 रुग्ण धामणगाव रेल्वे येथे आढळून आले असून अमरावतीतील एसआरपी कॅम्प या पोलीस वसाहतीत पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. यासोबतच साईनगर भागात चार नवे रुग्ण आढळून आले असून यशोदा नगरमधील तीन रुग्णांची नोंद झाली आहे. या व्यतिरिक्त शहराच्या वेगवेगळ्या भागात नवीन रुग्ण आढळून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 87 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 941 जण रुग्णालयात दाखल असून त्यापैकी अमरावतीच्या कोविड रुग्णालयात 918 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. या व्यतिरिक्त नागपूर येथे 21 रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. तर 1923 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या