
राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 48 टक्के मतदान झाल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. आयोगाकडून रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नाही. दरम्यान, दिवसभरात आचारसंहितेचा भंग झाल्याच्या एकूण पंधरा तक्रारी दाखल झाल्या.
264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदासाठी चार हजारांहून अधिक तर नगरसेवकपदासाठी 50 हजार उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वांचे भवितव्य आज मशीनबंद झाले. आयोगाने उद्याची मतमोजणी रद्द केल्याने आता निकालासाठी 21 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.



























































