गुहागर तालुक्यातील पाच कोरोनाबााधित रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज

333

गुहागरमधील पॉझिटिव्ह 12 रुग्णांपैकी 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 29 जणांपैकी 24 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे गुहागरसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. गुहागर तालुक्यात एकूण 16 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून एकजण पूर्णपणे बरा झाला आहे. तर दोनजणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुहागरमध्ये ग्रामीण रुग्णालयातंर्गत कोव्हीड केअर सेंटर मध्ये आतापर्यंत 12 पॉझिटिव्ह रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये 11 रुग्ण वेळणेश्वर येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये आहेत. तर एकजण शहरातील गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या इमारतींमध्ये कोव्हीड केअर सेंटरमध्ये एक रुग्ण आहे. एकूण 12 रुग्णांपैकी शनिवारी वेळणेश्वर येथील 11 पैकी 4 रुग्णांना यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना घरी विलगीकरण करण्यात आले आहे. तसेच रविवारी एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येत आहे . यामुळे गुहागरमध्ये असलेल्या 12 रुग्णांपैकी 5 रुग्ण पूर्ण बरे झालेले आहेत. उर्वरीत 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या