येरवड्यातील तात्पुरत्या कारागृहातून 5 कैदी पळाले

486
pune-police

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातील काही कैदी तात्पुरत्या इमारतीमध्ये हलवण्यात आले आहेत. यामधील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील पाच कैदी आज फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अजिंक्य कांबळे, उत्तम कांबळे, सनी पिंटो, देवगण चव्हाण आणि अजिनाथ चव्हाण अशी फरार झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील काही कैद्यांना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या इमारतीमध्ये हलवण्यात आले होते. यातील अजिंक्य कांबळे, उत्तम कांबळे,सनी पिंटो, देवगण चव्हाण आणि अजिनाथ चव्हाण हे पाच आरोपी ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आहेत. हे पाच जण इमारतीच्या खिडकीचा गज कापून मध्यरात्रीच्या सुमारास पळून गेले आहेत. ही घटना काही वेळेतच लक्षात येताच आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली असून, या पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या