
सामना ऑनलाईन, शोपियां
जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. किलूरा गावात झालेल्या या चकमकीनंतर जवानांना एका दहशतवाद्याचा मृतदेह शुक्रवारी रात्री सापडला होता.
4 more bodies of terrorists visible at encounter site kiloora Shopian taking the total to 5 terrorists killed. Good Job boys , good for peace.
— Shesh Paul Vaid (@spvaid) August 4, 2018
सकाळी ८ च्या सुमारास जवानांना आणखी चार मृतदेह आढळून आले आहेत.
यातील एका दहशतवाद्याची ओळख पटली असून उमर मलिक असं त्याचं नाव असल्याचं जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक शेष पॉल वैद यांनी सांगितलं आहे. मलिक हा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली आहे. दहशतवाद विरोधातील लढाईत सुरक्षा दलांना मिळालेलं हे मोठं यश मानलं जात आहे.

























































