Lockdown – 5 वर्षाच्या विहानचा एकटा विमान प्रवास, 3 महिन्यांनी आईला भेटला

3500

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दोन महिन्यांपूर्वी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि असंख्य लोक आहे तिथेच अडकून पडले. मात्र हळूहळू देशातील वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येत असून 25 मे पासून विमानसेवा सुरू झाली आहे. ज्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. या लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकलेला पाच वर्षांचा एक मुलगा आज तीन महिन्यांनी विमानाने एकटा प्रवास करून आईला भेटला.

विहान शर्मा हा 5 वर्षाचा मुलगा गेले तीन महिने आई पासून दूर दिल्लीत राहत होता. आईला भेटण्यासाठी तो आतुर झाला होता. मात्र लॉकडाऊन वाढत गेल्याने तो बंगळुरूला पोहोचू शकत नव्हता. खरे तर 5 वर्षाच्या मुलास विमानातून एकटा प्रवास करण्याची परवानगी नसते, मात्र सद्य परिस्थिती लक्षात घेता त्याला तशी परवानगी देण्यात आली. तो ही आईच्या भेटीसाठी एकटा येण्यास तयार झाला. आज सकाळी दिल्ली-बंगळुरू विमानाने तो बंगळुरू विमानतळावर उतरला. इथे त्याची त्याला घेण्यासाठी पोहोचली होती. आईला पाहताच तो तिच्याजवळ गेला.

प्रवासात त्याने मास्क, हँड ग्लोज, अशी सगळी तयारी केली होती. तो तीन महिन्यांपासून दिल्लीत होता, आज तीन महिन्यांनी एकटा प्रवास करून तो परतला, अशी प्रतिक्रिया त्याचा आईने दिली. असे असंख्य प्रवासी अनंत अडचणींवर मात करून घरी पोहोचत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या