दिवाळीनिमित्त जियोची ऑफर, 4G मोबाईल मिळणार अर्ध्या किंमतीत

5675

दिवाळीच्या पार्श्वभुमीवर जियो आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एक धमाकेदार प्लान आणला आहे. जियोचा 4 G मोबाईल अर्ध्या किंमतीत मिळणार आहे.

जियोचा सध्याच  4 G मोबाईलची किमंत दीड हजार इतकी आहे. दिवाळीत हा मोबाईल अवघा 699 रुपयांना मिळणार आहे. हा मोबाईल लॉन्च केल्यानंतर तब्बल सात कोटी २जी वापरकर्त्यांना जियोशी जोडण्यात यश आल्याचा दावा कंपनीने केला आहे. आता 35 कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य कंपनीने ठरवले आहे.

हा फोन दसरा आणि दिवाळीला ग्राहकांना मिळणार आहे. या ऑफरमध्ये एकच अट आहे की तुम्ही तुमचा जुना फोन देऊन एक्सचेंजमध्ये फक्त 699 रुपयांत मिळणार आहे. या मोबाईलसोबत 99 रुपयांचा अतिरिक्त डेटाही ग्राहकांना मिळणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या