‘टीम इंडिया’च्या प्रशिकपदाच्या शर्यतीत  रवी शास्त्रींसह सहा जण

428

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) ‘टीम इंडिया’च्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी 16 ऑगस्टला मुलाखती होणार आहेत. ‘बीसीसीआय’ने सहा जणांची मुलाखतीसाठी निवड केली असून यातून एकाची प्रशिक्षक म्हणून निवड करताना मुलाखत घेणाऱ्या समितीचा कस लागणार आहे. त्या संभाव्य सहा दिग्गजांचा घेतलेला हा लेखाजोखा.

माइक हेसन : न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक. 2012 ते 2018 दरम्यान त्यांनी या संघाचे प्रशिक्षकपद भूषविले. न्यूझीलंडला वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत पोहोचविण्यात मोलाची भूमिका.

टॉम मुडी : याआधीही ‘टीम इंडिया’च्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी तीन (2005, 208, 2016) वेळा अर्ज केलेला आहे, मात्र त्याला अद्यापि संधी मिळालेली नाही. 53 वर्षीय टॉम मुडी यांच्या मार्गदर्शनाखालीच श्रीलंकेने 2007 च्या विश्वचषक स्पर्धेत फायनलपर्यंत धडक मारली होती.

फिल सिमन्स : वेस्ट इंडीजचे माजी सलामीवीर. 26 कसोटी खेळण्याचा अनुभव असलेल्या सिमन्स यांनी 2004 मध्ये झिम्बाब्वे संघाकडून प्रशिक्षकपदाची कारकीर्द सुरू केली. त्यानंतर दोन वेळा त्यांनी वेस्ट इंडीज संघाचेही प्रशिक्षकपद भूषविले होते.

रॉबिन सिंह : 2007 ते 2009 पर्यंत ‘टीम इंडिया’चे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक. युवराज सिंग व मोहम्मद कैफ यांच्या आधीचे ‘टीम इंडिया’चे अव्वल क्षेत्ररक्षक. ‘टीम इंडिया’च्या प्रशिक्षकपदाचे प्रबळ दावेदार. मुंबई इंडियन्स संघाचे विद्यमान फलंदाजी प्रशिक्षक.

लालचंद राजपूत : ‘टीम इंडिया’चे माजी व्यवस्थापक. 2007 मधील टी-20 वर्ल्ड कप विजेत्या हिंदुस्थानी संघाचे ते व्यवस्थापक होते. हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियात कॉमनवेल्थ बँक सीरिज जिंकली होती तेव्हाही ते संघासोबत होते.

रवी शास्त्री : अनिल कुंबळे यांच्या कार्यकाळात वादग्रस्त परिस्थितीत ‘टीम इंडिया’च्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. रवी शास्त्र्ााRच्या कारकिर्दीत ‘टीम इंडिया’ला अद्यापि एकदाही ‘आयसीसी’ कुठलीच स्पर्धा जिंकता आली नाही. 2014 ते 2016 पर्यंत ते ‘टीम इंडिया’चे संचालकही होते.

आपली प्रतिक्रिया द्या