अकोल्यात आढळले कोरोनाचे 6 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 88 वर 

632

अकोल्यात विक्राळ रुप धारण करीत असलेल्या कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी त्यात आणखी 6 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. राधाकिसन प्लॉट, उगवा अकोट फैल, बैदपुरा, माळीपूरा, खंगनपुरा या भागातील सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी सकाळी जाहीर करण्यात आले. सहा नवे रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 88 वर पोहचला असून, सद्यस्थितीत 63 अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मिळालेल्या माहितीनूसार गुरुवारी सहा अहवाल प्राप्त झाले. धक्कादायक बाब म्हणजे या सहा रुग्णांमध्ये एक महिला रुग्ण ही जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित झालेली असून, ती अकोट फैल भागातील आहे. शहरालगतच्या उगवा या गावातील एक रुग्णही कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे कोविड-19 आजार आता ग्रामीण भागातही पाय पसरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या