हार्बरवरील एसी लोकलला प्रचंड प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हार्बर मार्गावर ‘प्रजासत्ताक दिना’चा मुहूर्त साधून सुरु केलेल्या एसी लोकलला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. अवघ्या 16 दिवसांत 6 लाख 40 हजारांहून अधिक प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला. सद्यस्थितीत दररोज सरासरी 40 हजारांहून अधिक प्रवासी एसी लोकलने प्रवास करीत असून नजिकच्या काळात प्रवासी संख्या आणखी वाढेल, असा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेपाठोपाठ हार्बर मार्गावर एसी लोकलची सेवा सुरू करण्यात आली आहे. दिवसभरात एसी लोकलच्या 14 फेऱ्या चालवण्यात येत आहेत. सध्या लोकलमधील गर्दीला वैतागलेले प्रकासी एसी लोकलच्या प्रवासाला पसंती देत आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने मागील 16 दिवसांतील प्रवासी संख्या गुरुवारी जाहीर केली.