अमरावतीत 6 जण कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनााधितांची संख्या 151 वर

571

अमरावतीत आणखी 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 151वर गेसी आहे. शनिवारी दुपारी मिळालेल्या अहवालानुसार आणखी 6 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या 151 झाली आहे. शनिवारी आलेल्या अहवालानुसार मसानगंज येथील 75 वर्षीय पुरूष, बजरंग टेकडी येथील 18 वर्षीय तरुण, विलास नगर येथील ५२ वर्षीय पुरूष, अकोलातील 28 वर्षीय तरुण, खुर्शीदपुरातील 42 वर्षीय पुरूष आणि रतनगंज येथील 52 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या