हरिद्वारच्या मनसा मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू

हरिद्वारच्या मनसा देवीच्या मंदिरात चेंगराचेंगरी झाली असून यात सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. या चेंगराचेंगरीत काही भाविक जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविवार असल्याने हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी एका ठिकाणी विजेचा करंट बसत असल्याची अफवा पसरली त्यामुळे मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर एकच गोंधळ उडाला व चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.