रत्नागिरीत आढळले कोरोनाचे 63 रुग्ण, पाच रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 63 कोरोनाबाधित रुग्ण सापडले़. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 6 हजार 832 वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात आणखी 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला़. त्यामुळे कोरोनाबाधित मृतांची संख्या 225 झाली आहे़

रत्नागिरी तालुक्यातील 48 वर्षीय पुरुष आणि 73 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गुहागर तालुक्यातील 60 आणि 70 वर्षीय दोन पुरुषांचा आणि संगमेश्वर तालुक्यातील 70 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला़. आज 164  कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत  5080 जणांनी कोरोनावर मात केली़. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 74.35 टक्के झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या