बुलढाण्यात आढळले कोरोनाचे 64 रुग्ण, आतापर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू

585

बुलढाण्यात आज कोरोनाचे 64 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 971 वर पोहोचली आहे. तसेच आज 9 कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत 1160 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 1160 आहे. आज रोजी 116 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1२579 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1971 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 1169 कोरोनाबाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या 767 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार  सुरु आहेत. तसेच आजपर्यंत 35 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या