65 व्या वर्षी मुंबई ते मालवण पाचशे किलोमीटरचा सायकल प्रवास

मुंबई ते मालवण हा प्रवास सायकलने करून मुंबई येथील 65 वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी गंगाधर भगवान गावकर यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. दरम्यान, सहा दिवस सायकल प्रवास करून शुक्रवारी (8) मालवण येथे दाखल झालेल्या गंगाधर व त्यांच्या सहकाऱ्यांचे मालवणात जोरदार स्वागत करण्यात आले.

मालवण तालुक्यातील वायरी गावातील मूळ रहिवासी असलेले गंगाधर खाजगी क्षेत्रात नोकरीच्या निमित्ताने मुंबईला होते. गेली अनेक वर्षांपासून मुंबई ते मालवण हा सायकल प्रवास करावा असे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी जितेंद्र बटा (रा. तारकर्ली) या तरुणाने त्यांना साथ दिली. दोघेही 3 नोव्हेंबर रोजी सायकलने मालवण-तारकर्ली हे धेय्य घेऊन निघाले. यावेळी त्यांना अडचणीच्यावेळी सोबत म्हणून निवृत्ती केळुसकर हे प्राध्यापक मित्र त्यांच्या सोबत दुचाकी घेऊन होते.

स्वप्न पूर्ण झाले याचा आनंद

आपल्या सायकल या सर्वसामान्य अश्याच होत्या. त्या महागड्या वगरे नव्हत्या. एक स्वप्न म्हणून हा प्रवास आपण पूर्ण केला. प्रवासात सायकलची काही समस्या आली. मात्र सर्वांवर मात करत आज स्वप्न पूर्ण झाले याचा आंनद आहे. अशी भावना गंगाधर गावकर यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या