‘फिल्म फेअर’वर गली बॉयची मोहोर

830
gully-boy-poster

65व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रणवीर सिंग आणि आलिया भट अभिनित ‘गली बॉय’ या चित्रपटाने आपली छाप पाडली. जवळपास 13 विभागांमध्ये नामांकन मिळालेल्या या चित्रपटाला 10 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

हा सोहळा गुवाहाटी येथील इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये पार पडला. या सोहळ्यात अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, रणवीर सिंगपासून ते माधुरी दीक्षित आणि आलिया भटपर्यंतच्या कलाकारांनी जबरदस्त परफॉर्मन्स देत सोहळ्याला चार चांद लावले. ‘गली बॉय’ने सर्वोत्कृष्ट कलाकार, दिग्दर्शन, संगीत अशा विविध विभागांमध्ये आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं आहे. वाचा पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणवीर सिंग (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – झोया अख्तर (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट चित्रपट – गली बॉय
सर्वोत्कृष्ट संवाद- विजय मौर्य (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट पटकथा – रीमा कागती आणि झोया अख्तर (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अमृता सुभाष (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सिद्धांत चतुर्वेदी (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण – आदित्य धर (उरी- द सर्जिकल स्ट्राईक)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) – अभिमन्यू दसानी (मर्द को दर्द नहीं होता)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) – अनन्या पांडे (स्टुडंट ऑफ द इअर 2)
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम – गली बॉय आणि कबीर सिंग
सर्वोत्कृष्ट मूळ कथा- अनुभव सिन्हा आणि गौरव सोलंकी (आर्टिकल 15)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – शिल्पा राव ( घुंघरू टूट गये, वॉर)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अरिजित सिंह (कलंक नहीं, कलंक)
सर्वोत्कृष्ट गीत- अपना टाईम आयेगा (डिवाईन आणि अंकुर तिवारी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पुरस्कार – भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू (सांड की आंख)
सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक पुरस्कार – आयुष्मान खुराना (आर्टिकल 15)
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्कार – आर्टिकल 15
सर्वोत्कृष्ट संगीत पदार्पणासाठी आर. डी. बर्मन पुरस्कार- शाश्वत सचदेव (उरी- द सर्जिकल स्ट्राईक)
चित्रपट जगतातील यशस्वी कारकिर्द- गोविंदा
जीवन गौरव पुरस्कार- रमेश सिप्पी

आपली प्रतिक्रिया द्या