येथील सिटी युनियन बँकेतून व्यवसायासाठी कर्ज घेताना तारण म्हणून जमीन दिली होती. बनावट कागदपत्र बनवून त्या जमिनीची परस्पर विक्री करून 66 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार मॅनेजर पी. एन. नागराजा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
हेमांगी प्रसाद मेटे, छाया विश्वनाथ मेटे, प्रसाद विश्वनाथ मेटे (सर्व रा. शाहूनगर, चांदुर) यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याची तक्रार आहे. हेमांगी मेटे, छाया मेटे यांनी प्रत्येकी 33 लाख असे 66 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जापोटी प्रसाद मेटे यांच्या मालकीची कबनूरमधील मिळकत तारण ठेवली होती. त्यावर बँकेचा बोजा नोंद आहे. या मिळकतीची बनावट कागदपत्रे तयार करून तिघांनी मिळकत परस्पर विक्री केली आणि बँकेची फसवणूक केली, म्हणून गुन्हा दाखल केला आहे.