धाराशिवमध्ये आढळले कोरोनाचे 7 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 50 वर

409

धाराशिव जिल्ह्यात मंगळवारी प्रलंबित असलेल्या 11 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात 7 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येने जिह्यात अर्धशतक पूर्ण आहे.

बुधवारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये दोघेजण लोहारा तालुक्यातील जेवळी येथील असून ते यापूर्वीच्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. तिघेजण कार्ला येथील  असून तिघेही मुंबईहून आलेले आहेत. धाराशिव तालुक्यातील धुत्ता येथे आणखी एक व्यक्ती कोरोनाबाधित असून मुंबईहून परत आलेली आहे. केसरजवळगा (येथेही एक कोरोनाबाधित आढळला असून तो यापूर्वीच्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आहे.

जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाबाधितांची संख्या आता 43 वर गेली होती. त्यात मंगळवारी प्रलंबित असलेल्या 11 पैकी 7 जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या आता 50 वर गेली आहे. यापैकी 8 जणांना उपचाराने बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलेले आहे. तर 42 जणांवर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या