SUV कार बाईकला धडक देऊन ट्रकवर आदळली , भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांसह सात ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरू महामार्गावरील होस्कोट येथे शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात झाला असून यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. सात पैकी सहा जण हे विद्यार्थी होते. तर एक तरुण हा रात्रपाळी करून घरी परतत असताना त्याचा या अपघातात मृत्यू झाला.

होस्कोट दाबास्पेट मार्गावरील सत्यवारा गावाजवळ भरधाव येणाऱ्या एका SUV कारने सर्वात आधी एका बाईकस्वाराला धडक दिली. त्यानंतर ती गाडी एका ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात बाईकवरील तरुणाचा मृत्यू झाला तर SUV मध्ये बसलेले सहाही विद्यार्थी जागीच ठार झाले.