लातूरमध्ये जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ; कोरोनाबाधितांची संख्या 726 वर

804

लातूर जिल्ह्यामध्ये जुलै महिना कोरोनाबाधितांची संख्या वाढवणारा ठरला आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 726 वर पोहचली आहे. जुलै महिन्याच्या 12 दिवसात तब्बल 363 रुग्ण वाढले आहेत.

लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जुलै महिन्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. जुलै महिन्यातील १२ दिवसांमध्ये तब्बल 363 रुग्ण वाढले आहेत. 1 जुलै रोजी 33 रुग्ण, 2 जुलै रोजी 13, 3 जुलै रोजी 8, 4 जुलै रोजी 21, 5 जुलै रोजी 38, 6 जुलै रोजी 29, 7 जुलै रोजी 40, 8 जुलै रोजी 24, 9 जुलै रोजी 53, 10 जुलै रोजी 19, 11 जुलै रोजी 45, 12 जुलै रोजी 40 रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली. लातूर जिल्ह्यात एप्रिल 2020 मध्ये केवळ 16 रुग्ण सापडले होते. मे 2020 मध्ये 120 रुग्ण आढळून आले. जून 2020 मध्ये 218 रुग्ण वाढले तर जुलैच्या 12 दिवसांमध्ये तब्बल 363 रुग्ण वाढले आहेत. यामुळे लातूर जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 30 जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या