छत्तीसगडमध्ये 8 नक्षलवाद्यांना अटक, बंदुका आणि बॉम्ब बनवण्याचे सामान जप्त

36

सामना ऑनलाईन । दंतेवाडा  

छत्तीसगडमध्ये किरंदुल भागात सुरक्षादलांनी शुक्रवारी आठ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. यापूर्वी गुरूवारी नक्षलवादी आणि सुरक्षादलामध्ये उडालेल्या चकमकीत एक कमांडर मारला गेला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरंदुल पोलीस स्थानक क्षेत्रातील हिरोली भागात ५० जवानांनी शोधमोहीम हाती घेतली होती. त्यात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. त्यानंतरही शोध मोहीम संपली नव्हती. शुक्रवारी जवानांनी ही शोधमोहीम पुन्हा सुरू केली तेव्हा त्यांनी आठ नक्षलवाद्यांना अटक केली. या आठ नक्षलवाद्यांमध्ये चार महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या