आठ पोलिसांचे हत्या प्रकरण; दयाशंकर अग्निहोत्री अखेर अटकेत

807
crime

उत्तर प्रदेश येथील कानपूर जिह्यात बिकरु गावात 8 पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे अद्याप फरार असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी त्याचा साथीदार दयाशंकर अग्निहोत्री याला आज अटक केली असून त्याचावर 25 हजार बक्षीस ठेवण्यात आले होते. दरम्यान, दयाशंकर यांनी चौकशी दरम्यान अनेक खुलासे केले असून त्यात प्रामुख्याने विकासने ज्या बंदुकीने पोलिसांची हत्या केली ती दयाशंकर यांची होती. तर हल्ल्याच्या अगोदर विकासला एक फोनदेखील आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

उत्तर प्रदेश येथील कानपूर जिह्यात बिकरु गावांत 8 पोलिसांची हत्या झाल्याचे प्रकरण नुकतेच उजेडात आले होते. या घटनेला तीन दिवस उलटले तरी अद्याप मुख्य आरोपी विकास दुबे पोलिसांच्या हाती लागलेल्या नाही. त्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या साथीदारांना पकडण्यास सुरुवात केली असून रविवारी पोलिसांनी कल्याणपूर येथून त्याचा साथीदार दयाशंकर याला अटक केली. यावेळी अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दयाशंकर याने गोळीबारदेखील केला. पण पोलिसांनी त्याला अटक करीत त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, पोलिसांनी फरार विकास दुबे याच्यावर रोख रक्कमेचे पारितोषिक वाढवून 1 लाख इतके केले आहे.

जमिनीवरदेखील केलाय कब्जा

फरार विकास दुबे याने चौबेपुरे येथे राहुल तिवारी यांचे सासरे लल्लन शुक्ला यांच्या जमिनीवरदेखील कब्जा केला आहे. याविरोधात राहुलने न्यायालयात याचिका दाखल केली असून विकासने त्याच्या साथीदाराच्या मदतीने राहुलचे अपहरण करुन त्याला मारहाण देखील केली होती. याविरोधात राहुलने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या