बीडमध्ये 80 जणांना अन्नातून विषबाधा, सर्व रुग्णांवर उपचार सुरू

636

बीड मध्ये गोकुळ अष्टमीचा उपवास असल्याने नागरिकांनी एका किराणा दुकानातून भग घेतली होती. ही भगर बाधित निघाल्याने भगर खाल्ल्याने अनेकांना उलट्या, मळमळ सुरू झाली. तब्बल 80 जणांना भगरीची विष बाधा झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील तळणीवाडीत घडली.  बाधित रुग्णांना गेवराई च्या उपजिल्हा रुग्णालयात, खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले

गेवराई तालुक्यातील धोंडराई जवळ असणाऱ्या तळणी वाडीत आज गोकुळ अष्टमीच्या दिवशी खळबळ घटना घडली. उपवासानिमित खाण्यात आलेल्या भगरीतून गावातील 80 पेक्षा जास्त जणांना विषबाधा झाली. भगर झाल्यानंतर उलट्या मळमळ सुरू झाल्याने प्रत्येक रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले मोठी धांदल उडाली. गेवराईच्या उपजिल्हारुग्णालयात तर काही जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर रुग्णांना बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या