आदिनाथ महेश कोठारे साकारणार दिलीप वेंगसरकर

472

मराठी इंडस्ट्री गाजवल्यानंतर अभिनेता आदिनाथ कोठारे आता बॉलीवूडमधील नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. सध्या ‘83’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाचे आणखी एक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून ज्यात मराठमोळा अभिनेता आदिनाथ महेश कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटातील कपिलदेव यांच्या भूमिकेत रणवीर सिंह झळकणार असून हा चित्रपट 10 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. मधू मंटेना, साजिद नाडियाडवाला आणि रिलायन्स एंटरटेन्मेंटने चित्रपटाची निर्मिती केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या