’83’ मध्ये ‘हा’ कलाकार साकारणार मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका, लूक प्रदर्शित

1109

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील हिंदुस्थाच्या ऐतिहासिक विजयावर आधारित 83 या चित्रपटाबाबत उत्सुकता चांगलीच वाढली आहे. कारण, या चित्रपटातील कलाकारांचे लूक आणि त्यांच्या भूमिकेवरून पडदा उचलला जात आहे.

सुनील गावस्कर आणि के. श्रीकांत यांच्या भूमिकांमधील कलाकारांचा उलगडा नुकताच करण्यात आला. या भूमिका अनुक्रमे ताहिर राज भसीन आणि जीवा हे दोन कलाकार साकारणार आहेत. आता मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेतल्या कलाकाराचाही लूक व्हायरल झाला आहे. ही भूमिका साकिब सलीम या कलाकाराने निभावली आहे.

या बहुप्रतिक्षित चित्रपटामध्ये रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. ’83’ या चित्रपटाद्वारे हिंदुस्थानच्या पहिल्या विश्वविजयाचे स्पप्न पडद्यावर साकारण्यात येत आहे. या चित्रपटासाठी रणवीर सिंह आणि टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटात ताहीर भसीन, जीवा, अॅम्मी विर्क, जीवा, साहिल खट्टर, धैर्य करवा, दिनकर शर्मा, जतीन सारना, हॅरी संधू, आर. बद्री, पंकज त्रिपाठी अशी स्टारकास्ट असणार आहे. तसेच आदिनाथ कोठारे आणि चिराग पाटील हे दोन मराठमोळे कलाकारही या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. रणवीर सिंग याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण ही देखील कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. कबीर खान दिग्दर्शित 83 हा चित्रपट 10 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या