83 टक्के विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी विशेष गुणवत्ता यादी 22 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. या फेरीनंतरही काही विद्यार्थी प्रवेश घेऊ न शकल्यास पुढील प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. तसेच यंदाही प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरी होणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान आतापर्यंत 83 टक्के विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश झाले आहेत. तर दीड लाखाहून अधिक जागा रिक्त आहेत. 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता विशेष फेरी 3 जाहीर होणार आहे.