Video – ’83’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुचर्चित बॉलीवूड चित्रपट ‘83’ चा ट्रेलर अखेर प्रेक्षांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला असून हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ट्रेलरच्या आधी 26 नोव्हेंबरला या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला होता. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत 24 डिसेंबर 2021 प्रदर्शित होणार आहे.

कबीर खान दिग्दर्शित ‘83’  चित्रपट एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र त्याच्या मार्गात अनेक अडचणी आल्या.   हा चित्रपट टीम इंडियाने 1983 साली जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकावर आधारित आहे. रणवीर सिंग माजी क्रिकेटपटू कपिलदेवच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू  यांच्याही भूमिका आहेत.