परभणीत 840 किलो बनावट खवा जप्त; एनसीबीची कारवाई

436

परभणी शहरातील नानलपेठ भागात राहणारा गिरीश शंकरराव साई प्रॉडक्ट्स (गांधीनगर) कंपनीच्या नावाने जामखेड (जि. नगर) येथे बनावट खवा आणि दुग्धजन्य पदार्थ साथीदाराच्या मदतीने तयार करत होता. ते पदार्थ परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यात विक्री करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या एका कारवाईतून उघडकीस आणला आहे. या कारवाईत सुमारे 840 किलो बनावट खवा जप्त केला आहे.

नानलपेठ भागातून पिकअप वाहन जप्त करण्यात आले असून गिरीश माटरा, सय्यद असलम हसन, सय्यद चांद शेख, करण शिंदे, सय्यद अहमद हसन या चौघांना पथकाने ताब्यात घेतले आहे. आरोपी आरोपींना सय्यद असलम हसन( रा. जामखेड) यांच्या घरी बेकायदेशीर खवा तयार करून साई प्रोडक्टस वलाद (गांधीनगर) या कंपनीच्या नावाची पाकिटे गुजरातमधून मागून हा खवा आयएसओ प्रमाणित असल्याचे दाखवून सहा महिन्यांपासून मिठाई तयार करणाऱ्या उत्पादकांना पुरवठा करण्याचा सपाटा सुरू केला होता. आपापसात कट रचून त्यांच्याकडील खवा अथवा दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याचा कोणत्याही प्रकारचा परवाना शैक्षणिक तांत्रिक गुणवत्ता, कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसतानाही स्थानिक व्यापाऱ्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. विषबाधा अथवा अपाय होईल अशा रीतीने खव्याची वाहतूक करण्यात येत होती. परभणी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा आर, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. त्यात 840 किलोचा असा एकूण 3 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नानलपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या