बुलढाण्यात आढळले कोरोनाचे 88 रुग्ण, 94 रुग्ण कोरोनामुक्त

बुलढाणा जिल्ह्यात आज कोरोनाचे 88 रुग्ण सापडले आहेत. तसेच 94 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 2265 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

आज रोजी 1230 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 18101 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 3222 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 2265 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 909 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 48 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या