नोकरीची संधी! बँकेत 884 जागांसाठी भरती

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) ने स्पेशलिस्ट ऑफिसर्स पदांची भरती सुरू केली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 ऑगस्टपर्यंत आहे. बँकांमध्ये स्केल 1 अधिकारीची 884 पदे भरली जाणार आहेत. सविस्तर माहिती ibps.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

सोने-चांदी पुन्हा स्वस्त, दरात मोठी घसरण

सोने आणि चांदीच्या दरात मंगळवारी घसरण झाली. सोने 213 रुपयांनी स्वस्त होऊन 24 पॅरेटचा भाव 10 ग्रॅमसाठी 68,904 रुपयांवर आला. तर चांदीच्या दरातही 506 रुपयांची घसरण झाली. चांदी आता प्रति किलोसाठी 78 हजार 444 रुपये झाली आहे. मुंबईत 22 पॅरेट सोन्याची किंमत 63,900 रुपये आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीचा नीचांक

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून ही घसरण गेल्या आठ महिन्यातील सर्वात मोठी घसरण आहे. ब्रेंट क्रूडच्या किमती घसरण्यामागे अमेरिकेतील खराब जॉब डेटा आणि मंदीची शक्यता आहे. अमेरिकेत जुलैमध्ये बेरोजगारीचा दर 4.3 टक्के होता. अमेरिकेत जर मंदी आली तर याची झळ संपूर्ण जगाला बसू शकते. अमेरिकेत लागोपाठ चौथ्यांदा बेरोजगारीचा दर वाढला आहे.