
महामार्गांच्या कनेक्टिक्हीटीमुळे जिह्याच्या विकासाला निश्चितपणे चालना मिळाली. मात्र, वाहनचालकांचा बेशिस्तपणा, आणि रस्त्यांच्या समस्यांकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष, अशा कारणांमुळे रस्ते अपघात काढले आहेत. तरीदेखील अपघात रोखण्यापेक्षाही नुसता दंडवसुलीकरच पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाचा भर आहे. धक्कादायक बाब म्हणजे जानेवारी 2022 ते 31 मार्च 2023 या 15 महिन्यांत सोलापूर जिल्ह्यातील अपघातांमध्ये 890 जणांचा मृत्यू झाला आहे.
रस्त्यांकरील खड्डे वेळेत बुजवले जावेत, सोलापूर-पुणे, सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-विजयपूर, सोलापूर-मंगळवेढा अशा महामार्गांवर संरक्षित जाळी बसवावी, गरजेच्या ठिकाणी विजेचे खांब बसवणे व अपघातप्रवण क्षेत्रात विशेषतः वळण रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे, तुटलेली जाळी तत्काळ दुरुस्त करणे, महामार्गांवर थांबलेली वाहने लगेचच तेथून बाजूला करणे, अशी कामे तातडीने करणे गरजेचे आहे.
मात्र, सध्याची वस्तुस्थिती वेगळीच आहे. वाढत्या अपघाताला निश्चितपणे बेशिस्त वाहनचालक तेवढेच जबाबदार आहेत. पण, अनेक अपघातांमध्ये निरापराधांनाही जीव गमवावा लागला आहे. त्यात नवविवाहितेचा पती, चिमुकल्यांचा वडील, वयस्क आई-वडिलांचा आधार हिरावला. पण, महामार्गाची देखभाल करण्यासाठी ‘एनएचआय’, ब्लॅकस्पॉटकर उपाययोजनांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, बेशिस्तांवरील कारवाईसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, स्थानिक पोलीस, ग्रामीण व शहर वाहतूक शाखेचे पोलीस आणि त्या सर्वांच्या कामांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व खासदारांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समिती कार्यरत असतानाही अपघात काढतातच कसे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रस्त्यांची देखभाल, दुरुस्तीसाठी वेळच नाही
महामार्गांकरील वाहनांकडून टोल वसूल करणारी यंत्रणा असो का रस्त्यांची देखभाल करणारा ‘एनएचआय’ विभाग असो, यांना अपघातानंतर तुटलेली लोखंडी जाळी वेळेवर दुरुस्तीसाठी केळ नाही. महामार्गांवर वाहतूक सुरक्षेसंबंधीचे पुरेसे फलक दिसत नाहीत. तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यांवर थांबलेली वाहने काही दिवस तेथेच दिसतात. कोंडीजवळील पुलाजवळ मागच्या वर्षी वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला अपघात होऊन सहा-सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तेथे विजेचे खांब बसविण्याची मागणी झाली, पण त्याकडेही गांभीर्याने पाहिले नाही. ब्लॅकस्पॉटवर काही दुरुस्तीची गरज असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काहीच कार्यकाही वेळेवर होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
सोलापूर जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी काटेकोर नियोजन केले जात आहे. सर्क यंत्रणांच्या समन्वयातून सर्वाधिक अपघात होणाऱ्या ठिकाणी ठोस उपाययोजना केल्या जातील. इंटरसेफ्टर वाहनांचे मार्ग निश्चित करणे, वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ वाढवून बेशिस्तांवर अधिकाधिक कारवाया केल्या जातील. महामार्गांवर वाहतूक सुरक्षेसंदर्भातील फलक कमी असून, ते वाढविण्यासंबंधी कार्यवाही केली जाईल.
– शिरीष देशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण.



























































