मॅगी खाल्ल्याने ९ मुलांची प्रकृती बिघडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । छत्तरपूर

दोन मिनिटांमध्ये भूक भागवणारी मॅगी ही लहान मुलांचा आवडता पदार्थ. मात्र हीच मॅगी खाल्ल्याने मध्यप्रदेशमधील छतरपूर गावात एकाच घरातील नऊ मुलांची प्रकृती बिघडली आहे. या मुलांना ग्वालिअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे मॅगीच्या गुणवत्तेबाबत पुन्हा शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याआधी एप्रिल महिन्याात मॅगीच्या पॅकेटमध्ये किडे आणि अळ्या सापडल्याचे उघड झाले होते. मुंबईतील नालासोपारा येथे राहणाऱ्या नितिन गोवळकर यांना मॅगीच्या पॅकेटमध्ये किडे व अळ्या सापडल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध इंस्टंट न्यूडल्स मॅगीत राखेचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त आढळून आल्याने मॅगी बनवणाऱ्या नेस्ले कंपनीला तब्बल ७० लाखांचा दंड ठोठवण्यात आला होता. त्यानंतर देशभरात मॅगीवर बंदी घालण्यात आली होती.