परभणीत 9 जणांना कोरोनाची लागण, एकूण रुग्णसंख्या 16 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणीत 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 16 वर पोहोचली आहे. बुधवारी प्रशासनाला प्राप्त झालेल्या कोरोना पॉझिटीव्ह अहवालात सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील 6, पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथील 1 आणि गंगाखेड येथील 1, परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे येथील 1 कोरोना बाधीत रुग्णाचा समावेश आहे. बुधवारी नव्याने 9 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. या अगोदर जिंतुर तालुक्यातील शेवडी येथील तिघे कोरोना बाधीत आढळले होते. त्यानंतर परभणी शहरातील मिलींदनगर भागात एक महिला, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील महिला आणि परभणी शहरातील साखला प्लॉट येथील एक युवक असे सहा जण कोरोना पॉझिटीव्ह आढळुन आले आहेत.

शेळगावच्या महिलेने वाढविली चिंता

मुंबई येथुन सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे दाखल झालेली एक महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळुन आली होती. या महिलेच्या संपर्कातील संशयीताचे स्वॅब घेण्यात आले होते. बुधवारी या संशयीतांचा अहवाल प्राप्त झाला असून महिलेच्या संपर्कातील इतर सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बरोबर पुर्णा तालूक्यातील माटेगाव मधील एक आणि गंगाखेड मधील दोघांचा पॉझिटीव्ह रिपोर्ट आला आहे. हे सर्व जण मुंबई येथून परभणीला परतले आहेत.

सलग चौथ्या दिवशी रुग्ण आढळले

मागील चार दिवसांपासुन परभणी जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण आढळुन येत आहेत. बुधवारी  एकाच दिवशी 9 संशयितांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्हाने जिल्ह्याच्या चिंतेतभर पडली आहे.