जम्मू-कश्मीरः कुपवाडामध्ये हिमकडा कोसळला, ९ जण बेपत्ता

सामना ऑनलाईन । कुपवाडा

जम्मू-कश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हिमकडा कोसळला. या दुर्घटनेनंतर एक टाटा सुमो गाडी आणि त्यामधील ८ जण बेपत्ता झाले आहेत. कुपवाडा-तंगधार मार्गावर खुनी नाला या ठिकाणी टाटा सुमो गाडी बेपत्ता झाली. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा एक सदस्यही बेपत्ता झाला आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी सैन्याने पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.

पूँछमध्ये पाकड्यांचा गोळीबार

पाकिस्तानने आज (शुक्रवारी) दुपारी दोनच्या सुमारास शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन पूँछ येथे गोळीबार केला. पाकड्यांच्या गोळीबाराला हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिले. या धुमश्चक्रीत हिंदुस्थानात जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या