परभणीत आणखी 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; 6 रुग्णांना डिस्चार्ज

353

परभणी जिल्ह्यात रविवारी 9 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 372 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून आतापर्यंत 181 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या रुग्णालयातील संक्रमीत कक्षात 178 रुग्ण उपचार घेत आहेत.

परभणी शहरासह जिल्ह्यात इनायत नगर भागात 33 व 35 वर्षीय महिला, 4, 6 वर्षांची मुले व 33 वर्षीय पुरुष असे एकूण ५, पूर्णा शहरातील शास्त्री नगरातील 61 वर्षीय पुरुष तसेच गंगाखेड शहरातील आंबेडकर नगरातील 42 वर्षीय व 49 वर्षीय पुरुष व देवळे जिनिंग भागातील 80 वर्षीय पुरुष असे एकूण 9 व्यक्ती रविवारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 372 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून 181 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी एकूण 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 11 संशयित नव्याने दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3826 संशयित रुग्ण दाखल झाले असून संसर्गजन्य कक्षात 249, विलगीकरण केलेले 632 व विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले 2945 एवढे रुग्ण आहेत. एकूण 3826 संशयितांचे स्वॅब घेतले गेले असून त्यातील 3470 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर 369 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. 125 स्वॅब अनिर्णायक असून 52 स्वॅब तपासणीस अयोग्य ठरले आहेत. 42 स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा कायम आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमित कक्षातून 6 कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने रविवारी सर्व औपचारिकता पूर्ण करीत डिस्चार्ज दिला. त्यात जवाहर कॉलनीतील 28 वर्षीय, 30 वर्षीय महिला व 3 वर्षीय मुलगा व 30 वर्षीय पुरुष तसेच पाथरी तालुक्यातील लोणी येथील 39 वर्षीय पुरुष व मानवत येथील जिजाऊ नगरातील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या